आमचे कॉलेकशन्स

पेरणी प्रकाशन चे वाचकप्रिय पुस्तके

ऑनलाईन बुक स्टोर

दगडी वाडा

245.00
वाड्याच्या प्रत्येक दगडाची बैठक घट्ट आणि मजबूत असली पाहिजे. बांधकाम असं व्हावं की, भविष्यात त्या वास्तुला तडा जाऊ नये. दगडाची किलचीसुद्धा निखळू नये. बेलदारानं वाडा बांधतांना आपलं सारं कसब पणाला लावावं; तसा मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे. या कादंबरीतील भाषा पारंपरिक चौकटीबाहेरची अर्थात मनस्वी आहे. रांगडी आहे. तिच्यावर कोणतीही वाङ्मयीन वा सांस्कृतिक चौकट लादलेली नाही. हा अस्सल गावरान ऐवज आहे. खेड्यापाड्यातील रांगड्या माणसांच्या रांगड्या मनातला, ओठातला, पोटातला आणि तोंडातला...

धूमसता धुमकेतू

280.00
धूमसत्ता धुमकेतू - योगीराज बागूल महाकवी वामनदादा कर्डक यांचे जीवनचरित्र वामन पहिल्या अंतऱ्यावर असतानाच श्रोत्यांमध्ये चुळबूळ झाली. श्रोत्यांच्या नजरा एका ठरावीक दिशेने वळल्या. बाबासाहेब त्यांच्या निवडक कार्यकर्त्यांसह सभेच्या ठिकाणी येत होते. वामनचे शब्द आणि स्वर ऐकून ते चमकले...! ते थेट मंचावर गेले नाही. मंचापुढील खुर्चीत सपत्निक बसले. पहिल्या रांगेतील मान्यवर पटापट बाजूला झाले. लेक गेल्याचे दुःख विसरुन वामन गाऊ लागला. प्रत्यक्ष मुक्तिदाताच पुढे बसला होता. वामन कृतार्थ झाला. पुढ्यात देशातील समुच्चय अस्पृश्य समाजाचा उद्धारक. त्याच्या समक्ष त्याच्याच कर्तृत्त्वाच्या रचना गाण्याचा हा अविस्मरणीय योगायोग ! पण तो अशा मनःस्थितीत ! वामनच्या एका डोळ्यात आनंद होता तर दुसऱ्या डोळ्यात दुःख. तो एकापाठी एक अंतरा गात होता. समेवर येत होता. धृपदाची ओळ आळवित होता. सोपे शब्द. सुटसुटीत रचना. शब्दांतला मोठा अर्थ. कोणालाही सहज समजावा असा –

आठवणीतले बाबासाहेब

280.00
डॉ. बाबासाहेब आंबेडकर— अजूनही अनाकलनीय महाकाय रसायन डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाकाय रसायन अजून कोणाही संशोधकास अथवा अभ्यासकास पूर्णत: समजलेलं नाही. महान पंडित अथवा अर्थशास्त्रज्ञ अथवा समाजोध्दारक याच्याही पलिकडे बरंच काही आहे., उत्कृष्ट बागवान, उत्कृष्ट तबलावादक, पाककलानिपूण, चित्रकार, व्हायोलिनवादक आणि आणखी काही... डॉ. आंबेडकर यांचा जवळून सहवास लाभलेल्या काही ठराविक व्यक्तींच्या मुलाखती घेऊन लेखकाने हा ग्रंथ साकारला आहे. डॉ. बाबासाहेबांचे अनेक नवनवीन पैलू यामधून समोर येतात. वरुन कठोर वाटणारी ही व्यक्ती आतून किती प्रेमळ होती याचाही प्रत्यय येतो...देश आणि समाज याशिवाय दुसरा विचारच नाही. ..प्रत्येक प्रकरणातून वेगळे बाबासाहेब समोर येतात, मनाला उचंबळून टाकणारे नि हृदयात खळबळ निर्माण करणारे; ते कसे...?

प्रिय रामू

240.00
‘प्रिय रामू...' हा चरित्रग्रंथ वाचावा, कारण– निरलसपणे पतीप्रती समर्पक आहुती देणं म्हणजे काय? अस्तित्व असेपर्यंत कापराने जळावे ते कसे? पती म्हणजेच सर्वस्व नव्हे श्वासच...! संघर्षाचा कळस. गरीबीची परिसीमा. काळजात कळ उठविणाऱ्या या सत्यघटना आहेत. खरंच...! विश्वास ठेवा, एक माऊली मंदपणे तेवत राहिली. विझेपर्यंत उजेड देत राहिली. आणि विझली तेव्हा...? एक विशाल सुशोभित नि भव्य महाल अंध:काराने दाटून गेला. तोच तो महाल... ‘राजगृह...!’ आणि तो राजा... तिचाच, नव्हे तर... या चरित्रग्रंथाच्या पानोपानी आसवं गळावी, शब्दोशब्दी मन पिळवटून जावे... असे काय बरं आहे यात...?

बाबासाहेब आणि त्यांचे दलितेतर सहकारी 1

320.00
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपली आणि आपल्या समाजाची मिरासदारी म्हणून मिरविणाऱ्यांनी खुब समजून असावे की, ती केवळ त्यांचीच मालमत्ता नव्हती आणि नाहीय. सदरील (डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी : भाग - १ व २) ग्रंथ वाचताना याचा प्रत्येय पानोपानी आणि शब्दोशब्दी येतो. हा युगपुरुष किती महान नव्हे अति महान होता याची जाणीव तीव्रतेने होते. त्या काळात त्याचा लोकसंग्रह जगभर पसरलेला. दलितेतर सहकाऱ्यांनीही त्याला हाताच्या फोडासारखं जपलं जे आतापर्यंत वाचकांपर्यंत पोचलंच नव्हतं. खरंच का या पृथ्वीवर अशीही माणसं जन्मलीत...??

बाबासाहेब आणि त्यांचे दलितेतर सहकारी २

320.00
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपली आणि आपल्या समाजाची मिरासदारी म्हणून मिरविणाऱ्यांनी खुब समजून असावे की, ती केवळ त्यांचीच मालमत्ता नव्हती आणि नाहीय. सदरील (डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी : भाग - १ व २) ग्रंथ वाचताना याचा प्रत्यय पानोपानी आणि शब्दोशब्दी येतो. हा युगपुरुष किती महान नव्हे अति महान होता याची जाणीव तीव्रतेने होते. त्या काळात त्याचा लोकसंग्रह जगभर पसरलेला. दलितेतर सहकाऱ्यांनीही त्याला हाताच्या फोडासारखं जपलं जे आतापर्यंत वाचकांपर्यंत पोचलंच नव्हतं. खरंच का या पृथ्वीवर अशीही माणसं जन्मलीत...??

तमाशा – विठाबाईंच्या आयुष्याचा

240.00
‘विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर' म्हणजे लोककलेच्या बोर्डावरील अनभिषिक्त सम्राज्ञी... लोककलेच्या विश्वातली ती एक अनभिषिक्त सम्राज्ञी. मनाला घायाळ करणारं तिचं सौंदर्य. अशिक्षित असूनही हजरजवाबीपणाची तिला देन होती. पोटातल्या भुकेची आग विझविण्यासाठी कशाचीही पर्वा न करता तिनं वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी पायात चाळ बांधले; बोर्डावर पाय ठेवला आणि घुंगरं झंकारली. मग सुरु झाला एक दैदिप्यमान प्रवास... मनाला अगदी थक्क करणारा. कमालीची समयसूचकता. जितका बेडर नि बिनधास्तपणा तितकाच मायेचा पाझरही! तिने एका शब्दाचीही तक्रार न करता आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्राचा लौकिक असलेल्या ‘तमाशा' कलेची अखंड सेवा केली. ही सौंदर्यवती महानायिका बोर्डावर बाळंतपणाच्या वेणा येईपर्यंत नाचली नि रसिक मायबापांच्या आग्रहास्तव बाळंत झाल्यानंतर अर्ध्याच तासात कासोटा घट्ट आवळून आणि पायात चाळ बांधून तिने पुन्हा बोर्डावर पाय ठेवला...आणखी बरंच काय...काय.. अगदी थक्क करणारं..! या लोककला सम्राज्ञीच्या आयुष्याची संध्याकाळ मात्र अशी कारुण्यमय झाली की....वाचल्यानंतर मन विदीर्ण व्हावं...

योगीराज बागूल हे मराठी साहित्य क्षेत्रातील आघडीचे अभ्यासक, विचारवंत आणि लेखक आहेत. ते अतिशय गरीब कुटुंबातून आले आहेत. त्यांनी आईबरोबर जमीनदारांच्या शेतात रोजंदारीचे काम करून आणि माळाला व गायरानात गुरे राखत शालेय शिक्षण तर ऊस तोडणीचे काम करीत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले