‘पेरणी प्रकाशन ‘ निलेश बागूल (बी.ई.मॅकेनिकल् एम् बी ए) या उच्च शिक्षित तरुणाने स्थापन केलेली प्रकाशन संस्था आहे. आजच्या घडीला तरुण मराठी पिढीने नोकरीच्या पाठी न धावता नियोजनबध्द पध्दतीने उडी घ्यावी असा संदेश यामधून देण्याचा प्रयत्न…!


योगीराज बागूल
 हे मराठी साहित्य क्षेत्रातील आघडीचे अभ्यासक, विचारवंत आणि लेखक आहेत. ते अतिशय गरीब कुटुंबातून आले आहेत. त्यांनी आईबरोबर जमीनदारांच्या शेतात रोजंदारीचे काम करून आणि माळाला व गायरानात गुरे राखत शालेय शिक्षण तर ऊस तोडणीचे काम करीत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

योगीराज बागूल यांचे शालेय शिक्षण त्यांच्या जन्मगावी खंडाळा (या.वैजापूर, जि.औरंगाबाद) येथील जिल्हापरिषद हायस्कूलमध्ये झाले तर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथील नागसेन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातून पुर्ण केले. साहित्याला आकार देण्यासाठी प्रा.प्र.ई. सोनकांबळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनभिज्ञ पैलू आणि त्यांचे अजूनही माहित नसलेले कार्य शोधणे हा बागूल यांचा विशेष आवडीचा आणि अभ्यासाचा मुख्य विषय असला तरी त्यांनी इतरही वाङमय प्रकाराला (आत्मचरित्र, चरित्र, कादंबरी, कविता आणि संपादन) स्पर्श केला आहे. बागूल यांनी लिहिलेली पुस्तके अनेक विद्यापीठांमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये अभ्यासक्रमासाठी आहेत. त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र आणि साधने प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे.

राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्स लि.(भारत सरकारचा उपक्रम) येथे उप व्यवस्थापक पदावर नोकरी करीत आहेत.

पुरस्कार  • महाराष्ट्र शासन (२), कोमसाप(२),  • आशीर्वाद पुरस्कार (२),  • कवी अनंत फंदी पुरस्कार-संगमनेर,  • प्रसाद बन वैद्यकिय प्रतिष्ठाण पुरस्कार-नांदेड,  • रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार-कोपरगाव,  • प्रज्ञा पुरस्कार-नांदेड,  • एकता कल्चर पुरस्कार-मुंबई,  • आपटे वाचन मंदिर पुरस्कार-इचलकरंजी,  • चंद्रकुमार नलगे पुरस्कार-उजळईवाडी,  • गुणवंत कामगार पुरस्कार-म.रा. • उत्कृष्ट संशोधनात्मक साहित्य निर्मितीसाठी सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठाचा ‘डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’

साहित्यनिर्मिती

बागूल यांनी लिहिलेल्या पुस्तकांची यादी – [१]

  • प्रिय रामू, चरित्र (पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
  • सोयरिक (काव्यसंग्रह-मृदगंधा प्रकाशन,भोसरी,पुणे)
  • ही वाट सुनसान कशी? काव्यसंग्रह (पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
  • पाचट आत्मचरित्र (पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी भाग-१ वैचारिक (पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
  • तमाशा : विठाबाईच्या आयुष्याचा, चरित्र (पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
  • आठवणीतले बाबासाहेब,व्यक्तिचित्र (पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
  • डॉ. बी. आर. आंबेडकर रेमनिसन्सिज बाय हिज क्लोज असोसिएट्स (इंग्रजी-अनोखी प्रकाशन)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी सहकारी भाग-2 वैचारिक,(पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
  • ‘यादें बाबासाहेब की’ (हिंदी भाषेत) सम्यक प्रकाशन, नवी दिल्ली.
  • ‘दळण दळीत्ये’ (आईच्या जात्यावरच्या ओव्यांचे संकलन-पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)