पेरणी ओळख
‘पेरणी प्रकाशन ‘ निलेश बागूल (बी.ई.मॅकेनिकल् एम् बी ए) या उच्च शिक्षित तरुणाने स्थापन केलेली प्रकाशन संस्था आहे. आजच्या घडीला तरुण मराठी पिढीने नोकरीच्या पाठी न धावता नियोजनबध्द पध्दतीने उडी घ्यावी असा संदेश यामधून देण्याचा प्रयत्न…!
‘पेरणी प्रकाशन आणि वितरण’ ही केवळ पुस्तके छापणारी आणि विकणारी प्रकाशन संस्था नाही. या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला नवीन पिढीवर सुसंस्काराची आणि संस्कृतीची पेरणी करावयाची आहे. पुस्तकांमध्ये शब्दांची गुंफण करीत असतांनाच नात्यांचीही गुंफण करावयाची आहे. नाते फक्त लेखक आणि वाचक इतके मर्यादित न ठेवता त्यामध्ये ऋणानुबंधाचा ओलावा निर्माण करावयाचा आहे. जमिनीचे आणि पिकाचे जे अलौकिक नाते असते तसे नाते साहित्यिक आणि वाचकांमध्ये निर्माण करावयाचे आहे. ‘पेरणी’ हे केवळ माध्यम असेल. असा पेरा करण्यासाठी जमीनही कसदार हवी असते आणि जमिनीत जे बी पेरावयाचे तेही असली हवे असते. तर आणि तरच पीक कसदार, डौलदार आणि बहारदार येईल.
आताशी ही आमची सुरुवात आहे. अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. केवळ महाराष्ट्रभरच नव्हे तर जगभर ‘पेरणी’चे वाचकांचे, वितरक आणि विक्रेत्यांचे नेटवर्क निर्माण करावयाचे आहे. वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे ही ‘आवई’ खोटी ठरवायची आहे. तुम्हा वाचकांची मनःपूर्वक साथ मिळाली तर ‘पेरणी’ने आकाशाला गवसणी घालण्याची तयारी ठेवली आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन नवनवीन संकल्पना राबविण्याचा पेरणीचा मनोदय आहे. भविष्यात आम्हाला अतिशय उपयुक्त अशी अनेक अती दुर्मीळ ग्रंथ प्रकाशित करावयाची आहेत. मराठी भाषा अतिशय समृद्ध आहे याची आम्हाला पुर्णतः जाणीव आहे. या भाषेचा कसा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल याचेही ‘पेरणी’ने प्रयोजन केले आहे.
पुस्तकी प्रकारातच गुंतून न राहता ऑडिओ बुकचे माध्यम निर्माण करण्याची आमची संकल्पना आहे. ती यशस्वी ठरली तर आम्ही व्हिडिओ बुकही करु. म्हणूनच आमचे ब्रीद वाक्य आहे ‘पेरणी संस्काराची-संस्कृतीची’. आमची टॅग-लाईन आहे, ‘आम्ही आहोत सदैव कटिबद्ध मायमराठीच्या संवर्धनासाठी ‘.
आपण वाचक आणि पेरणीचे हितचिंतक आम्हाला किती आणि कशी साथ देतात यावरच हे सर्व अवलंबून असणार आहे.
प्रकाशक,
पेरणी प्रकाशन आणि वितरण
| पुरस्कार | • महाराष्ट्र शासन (२), कोमसाप(२), • आशीर्वाद पुरस्कार (२), • कवी अनंत फंदी पुरस्कार-संगमनेर, • प्रसाद बन वैद्यकिय प्रतिष्ठाण पुरस्कार-नांदेड, • रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार-कोपरगाव, • प्रज्ञा पुरस्कार-नांदेड, • एकता कल्चर पुरस्कार-मुंबई, • आपटे वाचन मंदिर पुरस्कार-इचलकरंजी, • चंद्रकुमार नलगे पुरस्कार-उजळईवाडी, • गुणवंत कामगार पुरस्कार-म.रा. • उत्कृष्ट संशोधनात्मक साहित्य निर्मितीसाठी सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठाचा ‘डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ |
|---|
साहित्यनिर्मिती
बागूल यांनी लिहिलेल्या पुस्तकांची यादी – [१]
- प्रिय रामू, चरित्र (पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
- सोयरिक (काव्यसंग्रह-मृदगंधा प्रकाशन,भोसरी,पुणे)
- ही वाट सुनसान कशी? काव्यसंग्रह (पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
- पाचट आत्मचरित्र (पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी भाग-१ वैचारिक (पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
- तमाशा : विठाबाईच्या आयुष्याचा, चरित्र (पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
- आठवणीतले बाबासाहेब,व्यक्तिचित्र (पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
- डॉ. बी. आर. आंबेडकर रेमनिसन्सिज बाय हिज क्लोज असोसिएट्स (इंग्रजी-अनोखी प्रकाशन)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी सहकारी भाग-2 वैचारिक,(पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
- ‘यादें बाबासाहेब की’ (हिंदी भाषेत) सम्यक प्रकाशन, नवी दिल्ली.
- ‘दळण दळीत्ये’ (आईच्या जात्यावरच्या ओव्यांचे संकलन-पेरणी प्रकाशन-नवी मुंबई)
