दगडी वाडा
वाड्याच्या प्रत्येक दगडाची बैठक घट्ट आणि मजबूत असली पाहिजे. बांधकाम असं व्हावं की, भविष्यात त्या वास्तुला तडा जाऊ नये. दगडाची किलचीसुद्धा निखळू नये. बेलदारानं वाडा बांधतांना आपलं सारं कसब पणाला लावावं; तसा मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे. या कादंबरीतील भाषा पारंपरिक चौकटीबाहेरची अर्थात मनस्वी आहे. रांगडी आहे. तिच्यावर कोणतीही वाङ्मयीन वा सांस्कृतिक चौकट लादलेली नाही. हा अस्सल गावरान ऐवज आहे. खेड्यापाड्यातील रांगड्या माणसांच्या रांगड्या मनातला, ओठातला, पोटातला आणि तोंडातला...