तमाशा – विठाबाईंच्या आयुष्याचा
₹300.00 ₹240.00
‘विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर’ म्हणजे लोककलेच्या बोर्डावरील अनभिषिक्त सम्राज्ञी…
लोककलेच्या विश्वातली ती एक अनभिषिक्त सम्राज्ञी. मनाला घायाळ
करणारं तिचं सौंदर्य. अशिक्षित असूनही हजरजवाबीपणाची तिला देन होती. पोटातल्या भुकेची आग विझविण्यासाठी कशाचीही पर्वा न करता तिनं वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी पायात चाळ बांधले; बोर्डावर पाय ठेवला आणि घुंगरं झंकारली. मग सुरु झाला एक दैदिप्यमान प्रवास…
मनाला अगदी थक्क करणारा. कमालीची समयसूचकता. जितका बेडर नि बिनधास्तपणा तितकाच मायेचा पाझरही! तिने एका शब्दाचीही तक्रार न करता आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्राचा लौकिक असलेल्या ‘तमाशा’ कलेची अखंड सेवा केली. ही सौंदर्यवती महानायिका बोर्डावर बाळंतपणाच्या वेणा येईपर्यंत नाचली नि रसिक मायबापांच्या आग्रहास्तव बाळंत झाल्यानंतर अर्ध्याच तासात कासोटा घट्ट आवळून आणि पायात चाळ बांधून तिने पुन्हा बोर्डावर पाय ठेवला…आणखी बरंच काय…काय.. अगदी थक्क करणारं..! या लोककला सम्राज्ञीच्या आयुष्याची संध्याकाळ मात्र अशी कारुण्यमय झाली की….वाचल्यानंतर मन विदीर्ण व्हावं…
Out of stock
Reviews
There are no reviews yet.