धूमसता धुमकेतू
₹400.00 Original price was: ₹400.00.₹280.00Current price is: ₹280.00.
धूमसत्ता धुमकेतू – योगीराज बागूल
महाकवी वामनदादा कर्डक यांचे जीवनचरित्र
वामन पहिल्या अंतऱ्यावर असतानाच श्रोत्यांमध्ये चुळबूळ झाली. श्रोत्यांच्या नजरा एका ठरावीक दिशेने वळल्या. बाबासाहेब त्यांच्या निवडक कार्यकर्त्यांसह सभेच्या ठिकाणी येत होते. वामनचे शब्द आणि स्वर ऐकून ते चमकले…! ते थेट मंचावर गेले नाही. मंचापुढील खुर्चीत सपत्निक बसले. पहिल्या रांगेतील मान्यवर पटापट बाजूला झाले. लेक गेल्याचे दुःख विसरुन वामन गाऊ लागला. प्रत्यक्ष मुक्तिदाताच पुढे बसला होता. वामन कृतार्थ झाला. पुढ्यात देशातील समुच्चय अस्पृश्य समाजाचा उद्धारक. त्याच्या समक्ष त्याच्याच कर्तृत्त्वाच्या रचना गाण्याचा हा अविस्मरणीय योगायोग ! पण तो अशा मनःस्थितीत ! वामनच्या एका डोळ्यात आनंद होता तर दुसऱ्या डोळ्यात दुःख. तो एकापाठी एक अंतरा गात होता. समेवर येत होता. धृपदाची ओळ आळवित होता. सोपे शब्द. सुटसुटीत रचना. शब्दांतला मोठा अर्थ. कोणालाही सहज समजावा असा –
Reviews
There are no reviews yet.